कोविड रुग्णसंख्या अधिक असलेल्या 11 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, मनुष्यबळ, औषधे, रूग्णालयातील खाटा या सर्वांच्या उपलब्धतेचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला आढावा

कोविड रुग्णसंख्या अधिक असलेल्या 11 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, मनुष्यबळ, औषधे, रूग्णालयातील खाटा या सर्वांच्या उपलब्धतेचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला आढावा कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही कोविड विरुद्धच्या लढ्यात,केंद्र सरकारच्या श्रेणीबद्ध,आक्रमक उपाययोजना आणि सक्रीय दृष्टीकोनाला अनुसरून,केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज देशातल्या कोविड रुग्णसंख्या वाढत असलेल्या 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधींसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत कोविड-19 च्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, कोविड प्रतिबंधन,प्रतिबंधक क्षेत्रे आणि व्यवस्थापन याविषयीच्या कामांचा आढावा घेतला. तीन तासांपेक्षा अधिक काल चाललेल्या या बैठकीत, महाराष्ट्र, छत्तिसगढ, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तरप्रदेश या राज्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.