Posts

Showing posts from August, 2021

मानवजातीला भेडसावणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी चाकोरीबाहेरचे उपाय शोधण्याचे उपराष्ट्रपतींनी वैज्ञानिकांना केले आवाहन

Image
 उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी आज वैज्ञानिकांना हवामान बदल, कृषी, आरोग्य आणि औषध क्षेत्रात मानवजातीला भेडसावणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी चाकोरीबाहेरचे  उपाय शोधण्याचे आवाहन केले. बंगळुरू येथील जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्र (जेएनसीएएसआर) येथे वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी वैज्ञानिकांना उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आणि लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधन  करण्याचे आवाहन केले. 300 पेक्षा जास्त पेटंट तयार केल्याबद्दल आणि स्वदेशी शोधांवर आधारित काही स्टार्टअपच्या स्थापनेला प्रोत्साहन दिल्याबद्दल जेएनसीएएसआरचे त्यांनी कौतुक केले.

द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी शिवालिक आणि कदमत ही भारतीय नौदल जहाजे ब्रुनेई येथे दाखल

Image
भारताच्या 'अॅक्ट ईस्ट' धोरणाच्या अनुषंगाने, भारतीय नौदल जहाजे शिवालिक आणि कदमत 9 ऑगस्ट 21 रोजी दक्षिण पूर्व आशियातील मुआरा, ब्रुनेई येथे पोहचली.  मुआरा, ब्रुनेई येथे मुक्कामादरम्यान, दोन्ही जहाजांतील नौसैनिक रॉयल ब्रुनेई नौदलाबरोबर  विविध  सरावांमध्ये सहभागी होणार आहे. या कवायतींमुळे दोन्ही नौदलांना सर्वोत्तम कार्यपद्धतींमधून लाभ मिळवणे आणि सागरी सुरक्षा  प्रक्रियांची सामायिक माहिती जाणून घेण्याची  संधी उपलब्ध होईल.  समुद्रातील या  संयुक्त सरावाचा  उद्देश दोन्ही नौदलांमधील  बंध मजबूत करणे हा आहे आणि भारत-ब्रुनेई संरक्षण संबंध मजबूत करण्याच्या दिशेने हे आणखी एक पाऊल ठरेल. 12 ऑगस्ट 21 रोजी समुद्रात रॉयल ब्रुनेई नौदलाबरोबर  पॅसेज कवायतींनी  याची सांगता होईल.

सुलभ पेटंट आणि स्वामित्व हक्क नोंदणीप्रक्रियेमुळे भारत नवोन्मेषाचे केंद्र होण्यास मदत- पीयूष गोयल

Image
 पेटंट, डिझाईन्स स्वामीत्व हक्क आणि ट्रेड मार्क्सची तपासणी आणि मंजूरी देण्याच्या प्रक्रियेत झालेल्या सुधारणांविषयी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी समाधान व्यक्त केले आहे. अशा सुधारणा देशात ‘उद्योगपूरक वातावरण निर्माण करण्यासाठी पूरक असून, भारताला नवोन्मेषाचे केंद्र बनवण्यासाठी या सुधारणा उपयुक्त ठरतील, असे पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.  पीयूष गोयल यांनी काल संध्याकाळी मुंबईत पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्स महानियंत्रक कार्यालयात आढावा बैठक घेतली. पेटंट्स, डिझाईन्स आणि ट्रेडमार्क महानियंत्रक कार्यालयाने घेतलेल्या विविध उपक्रमांचा आढावा त्यांनी घेतला. तसेच, बौद्धिक संपदा अधिकारविषयक पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्याविषयी चर्चा केली.