कोविड -19 ला रोखण्यासाठीच्या तंत्रज्ञान व डेटा व्यवस्थापन विषयावरील अधिकारप्राप्त गटाच्या अध्यक्षांनी कोविन पोर्टलच्या कामगिरीबाबतच्या वावड्यांचे केले खंडन
यावर्षी 16 जानेवारीपासून भारत सरकार “संपूर्ण सरकार” पध्दती अंतर्गत प्रभावी लसीकरण मोहिमेसाठी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांना पाठिंबा देत आहे. भारताच्या भौगोलिकदृष्ट्या विविध कानाकोपऱ्यातील शेवटच्या नागरिकाला लस मात्रेची उपलब्धता सुलभ करण्यासाठी, केंद्र सरकारने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेत लसीकरणाबाबतचे सूक्ष्म पैलू जाणून घेण्यासाठी कोविन पोर्टल हा मंच तयार केला होता. लोकसंख्येच्या काही घटकांना फायदा होण्यासाठी कोविन मंचाने डिजिटल दुफळी निर्माण करून असंतुष्ट घटकांना सिस्टम हॅक प्लॅटफॉर्मचा वापर करून डिजिटल डिव्हाईड तयार केल्याचे आणि या घटकांना सिस्टमला हॅक करण्यास परवानगी दिल्याचे काही खोटे संदेश प्राप्त झाले आहेत. लसीकरण प्रक्रियेच्या जटिलतेबद्दल मूलभूत आकलनाच्या अभावामुळे नागरिकांनी मंचावर स्लॉट न सापडल्याच्या वावड्या उठवल्या की या मंचातच समस्या आहेत. हे संदेश आणि अहवाल चुकीचे आहेत आणि या प्रकरणात पूर्ण माहितीद्वारे समर्थित नाहीत.