आयआयटी दिल्लीने कोविड-19 साठी विकसित केलेला रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट संच केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री संजय धोत्रे यांनी आज जारी केला.

आयआयटी दिल्लीने कोविड-19 साठी विकसित केलेला रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट संच केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री संजय धोत्रे यांनी आज जारी केला. आयआयटी दिल्ली संशोधकांनी, संस्थेच्या जैववैद्यकीय अभियांत्रिकी केंद्राचे प्राध्यापक डॉ हरपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली हा संच विकसित केला आहे. आयआयटी दिल्ली संशोधकांचे आणि उत्पादक भागीदारांचे अभिनंदन करत हे तंत्रज्ञान, देशात कोविड चाचण्या उपलब्धतेत क्रांतिकारी बदल घडवेल असा विश्वास संजय धोत्रे यांनी व्यक्त केला. आयआयटी दिल्ली मध्ये उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करून हा संच विकसित करण्यात आला आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.