Posts

खाजगी क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्थांनी व्यावसायिक प्रशिक्षणाद्वारे तरुणांना सक्षम करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

Image
 युवकांनी त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात ज्ञान आणि कौशल्य संपादन करण्यासाठी दृढनिश्चयाने प्रयत्न करण्याचा आणि स्पर्धेला सामोरे जात यश मिळवण्याचा सल्ला उपराष्ट्रपती, एम व्यंकय्या नायडू यांनी आज दिला. विजयवाड्यातील स्वर्ण भारत ट्रस्ट, इथल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रशिक्षणार्थींना त्यांनी मार्गदर्शन केले. “मोठी स्वप्ने पाहा आणि ध्येय साध्य करण्यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने आणि समर्पणाने काम करा” असे ते म्हणाले.  एकटे सरकार तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांनी खाजगी क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्थांनी तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आणि त्यांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी किंवा रोजगार शोधण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करून सक्षम करण्याचे आवाहन केले.

मानवजातीला भेडसावणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी चाकोरीबाहेरचे उपाय शोधण्याचे उपराष्ट्रपतींनी वैज्ञानिकांना केले आवाहन

Image
 उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी आज वैज्ञानिकांना हवामान बदल, कृषी, आरोग्य आणि औषध क्षेत्रात मानवजातीला भेडसावणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी चाकोरीबाहेरचे  उपाय शोधण्याचे आवाहन केले. बंगळुरू येथील जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्र (जेएनसीएएसआर) येथे वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी वैज्ञानिकांना उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आणि लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधन  करण्याचे आवाहन केले. 300 पेक्षा जास्त पेटंट तयार केल्याबद्दल आणि स्वदेशी शोधांवर आधारित काही स्टार्टअपच्या स्थापनेला प्रोत्साहन दिल्याबद्दल जेएनसीएएसआरचे त्यांनी कौतुक केले.

द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी शिवालिक आणि कदमत ही भारतीय नौदल जहाजे ब्रुनेई येथे दाखल

Image
भारताच्या 'अॅक्ट ईस्ट' धोरणाच्या अनुषंगाने, भारतीय नौदल जहाजे शिवालिक आणि कदमत 9 ऑगस्ट 21 रोजी दक्षिण पूर्व आशियातील मुआरा, ब्रुनेई येथे पोहचली.  मुआरा, ब्रुनेई येथे मुक्कामादरम्यान, दोन्ही जहाजांतील नौसैनिक रॉयल ब्रुनेई नौदलाबरोबर  विविध  सरावांमध्ये सहभागी होणार आहे. या कवायतींमुळे दोन्ही नौदलांना सर्वोत्तम कार्यपद्धतींमधून लाभ मिळवणे आणि सागरी सुरक्षा  प्रक्रियांची सामायिक माहिती जाणून घेण्याची  संधी उपलब्ध होईल.  समुद्रातील या  संयुक्त सरावाचा  उद्देश दोन्ही नौदलांमधील  बंध मजबूत करणे हा आहे आणि भारत-ब्रुनेई संरक्षण संबंध मजबूत करण्याच्या दिशेने हे आणखी एक पाऊल ठरेल. 12 ऑगस्ट 21 रोजी समुद्रात रॉयल ब्रुनेई नौदलाबरोबर  पॅसेज कवायतींनी  याची सांगता होईल.

सुलभ पेटंट आणि स्वामित्व हक्क नोंदणीप्रक्रियेमुळे भारत नवोन्मेषाचे केंद्र होण्यास मदत- पीयूष गोयल

Image
 पेटंट, डिझाईन्स स्वामीत्व हक्क आणि ट्रेड मार्क्सची तपासणी आणि मंजूरी देण्याच्या प्रक्रियेत झालेल्या सुधारणांविषयी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी समाधान व्यक्त केले आहे. अशा सुधारणा देशात ‘उद्योगपूरक वातावरण निर्माण करण्यासाठी पूरक असून, भारताला नवोन्मेषाचे केंद्र बनवण्यासाठी या सुधारणा उपयुक्त ठरतील, असे पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.  पीयूष गोयल यांनी काल संध्याकाळी मुंबईत पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्स महानियंत्रक कार्यालयात आढावा बैठक घेतली. पेटंट्स, डिझाईन्स आणि ट्रेडमार्क महानियंत्रक कार्यालयाने घेतलेल्या विविध उपक्रमांचा आढावा त्यांनी घेतला. तसेच, बौद्धिक संपदा अधिकारविषयक पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्याविषयी चर्चा केली. 

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाच्या 18 व्या सन्मान सोहोळ्यात दुर्दम्य साहस, शौर्य आणि वीरता तसेच उत्कृष्ट सेवेसाठी दलातील शूर अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सन्मानित केले.

Image
 केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाच्या 18 व्या सन्मान सोहोळ्यात दुर्दम्य साहस, शौर्य आणि वीरता तसेच उत्कृष्ट सेवेसाठी दलातील शूर अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सन्मानित केले. शहा यांनी या वेळी रुस्तमजी यांच्या स्मरणार्थ व्याख्यान देखील दिले. या प्रसंगी, सीमा सुरक्षा दल या विषयावर ‘बावा’ नावाच्या माहितीपटाचे प्रदर्शन देखील करण्यात आले. केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय, केंद्रीय गृह सचिव अजय कुमार, सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. सीमा सुरक्षा दलाचे पहिले महासंचालक एफ रुस्तमजी यांना श्रद्धांजली वाहताना शाह म्हणाले की सीमा सुरक्षा दल आणि देशाच्या इतर निम-लष्करी दलांमुळेच भारत जगाच्या नकाशावर स्वतःचे गौरवशाली अस्तित्व टिकवून ठेवू शकत आहे. ते म्हणाले की आजदेखील उणे 45 डिग्री तापमान असुदे, लडाखच्या सीमा असुदेत, वाळवंटातील अतिउष्ण वातावरण असुदे, देशाच्या पूर्व भागातील नदी-नाले, जंगल, पर्वत असुदेत, अशा सर्व टोकाच्या वातावरणांमध्ये जे सैनिक त्यांचे कर्तव्य बजावत आहेत त्या त्यागी, वीर आणि य...

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती

Image
 आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती भारताच्या एकूण कोविड - 19 प्रतिबंधक लसीकरणाने 37.60 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी 7 वाजता उपलब्ध झालेल्या अहवालानुसार, एकूण 48,33,797 सत्रांमधून 37,60,32,586 लसीच्या मात्रा देण्यात आल्या. गेल्या 24 तासात 37,23,367 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. कोविड- 19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 रोजी प्रारंभ झाला आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. गेल्या 24 भारतात 41,506 दैनंदिन नवीन रुग्ण संख्येची नोंद करण्यात आली आहे.

केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मंत्रालयाकडून सुरू असलेल्या प्रकल्पांचा घेतला आढावा

Image
 केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मंत्रालयाकडून सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांचा आज आढावा घेतला. केंद्रीय  बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव डॉ. संजीव राजन यांनी मंत्र्यांना मंत्रालयाच्या विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. मंत्र्यांनी देखील त्यांच्या कक्षात मंत्रालयाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुसंवाद साधला.