केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाच्या 18 व्या सन्मान सोहोळ्यात दुर्दम्य साहस, शौर्य आणि वीरता तसेच उत्कृष्ट सेवेसाठी दलातील शूर अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सन्मानित केले.
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाच्या 18 व्या सन्मान सोहोळ्यात दुर्दम्य साहस, शौर्य आणि वीरता तसेच उत्कृष्ट सेवेसाठी दलातील शूर अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सन्मानित केले. शहा यांनी या वेळी रुस्तमजी यांच्या स्मरणार्थ व्याख्यान देखील दिले. या प्रसंगी, सीमा सुरक्षा दल या विषयावर ‘बावा’ नावाच्या माहितीपटाचे प्रदर्शन देखील करण्यात आले. केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय, केंद्रीय गृह सचिव अजय कुमार, सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. सीमा सुरक्षा दलाचे पहिले महासंचालक एफ रुस्तमजी यांना श्रद्धांजली वाहताना शाह म्हणाले की सीमा सुरक्षा दल आणि देशाच्या इतर निम-लष्करी दलांमुळेच भारत जगाच्या नकाशावर स्वतःचे गौरवशाली अस्तित्व टिकवून ठेवू शकत आहे. ते म्हणाले की आजदेखील उणे 45 डिग्री तापमान असुदे, लडाखच्या सीमा असुदेत, वाळवंटातील अतिउष्ण वातावरण असुदे, देशाच्या पूर्व भागातील नदी-नाले, जंगल, पर्वत असुदेत, अशा सर्व टोकाच्या वातावरणांमध्ये जे सैनिक त्यांचे कर्तव्य बजावत आहेत त्या त्यागी, वीर आणि य...